उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पांजरपोळमध्ये २५०० वृक्षांचे रोपण

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने चुंचाळे शिवारातील पांजरपोळमध्ये २५०० झाडे लावण्यात आली. या ठिकाणी एकूण १० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. मोतीवाला कॉलेजचे 120 विद्यार्थी व दिल्ली पब्लिक स्कूलच्या ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांसह पर्यावरण क्षेत्रात काम करणारे ५० कार्यकर्ते उपस्थित होते.

यात रमेश अय्यर, निशिकांत पगारे, जगबीरसिंग, भारती जाधव, प्रा. सोमनाथ मुठाळ, डॉ. अजय कापडणीस, शरयू कामत, चंदू पाटील, मनीष बाविस्कर, तुषार पिंगळे, मिलिंद पगारे, अंबरीश मोरे, अमित कुलकर्णी, तेजस तलवारे, पांजरपोळचे व्यवस्थापक विठ्ठल आगळेंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT