नाशिक : प्रीमियर लीगमध्ये विजेत्या फुटबॉल संघासमवेत मान्यवर. 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : प्रीमियर लीगमध्ये नाशिक फुटबॉलर्स, एनएफसीसी विजयी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यातील विविध क्लब, अकॅडमी यातील फुटबॉल खेळाडू यांच्यासाठी फुटबॉल प्रीमियर लीगचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सीबीएस येथे करण्यात आले होते. प्रीमियर लीगमध्ये नाशिक जिल्ह्यामधील सुमारे 170 मुले आणि 75 मुलींनी सहभाग नोंदविला होता.

सर्व मॅचेस या साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात आल्या. मुलांच्या फुटबॉल वॉरियर्सविरुद्ध नाशिक फुटबॉलर्स यांच्यात अंतिम सामन्यात नाशिक फुटबॉलर्स संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास चषक, पदक आणि रोख रक्कम रुपये 11,000 तर उपविजयी नाशिक वॉरियर्स या संघास चषक, पदक आणि रोख सात हजार देऊन गौरविण्यात आले. तर मुलींच्या संघामध्ये एनएफसीसीविरुद्ध शाहू एफसी यात अंतिम सामना झाला. यात एनएफसीसी संघाने प्रीमियर लीग विजेतेपद संपादन केले. संघास चषक, पदक आणि रोख तीन हजार तर उपविजयी शाहू एफसी संघास दोन हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. मुलांमध्ये उत्कृष्ट गोलकिपर म्हणून गौरांग महाजन, उत्कृष्ट गोल स्कोरर कुणाल तर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून आदित्य पिंगळे यांना ट्रॉफी आणि पदक देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून गौरव कडलग, किशोर बोरसे, मंगेश शर्मा, शक्ती गाडेकर, गगन सिंग, प्रतीक नैनवाल यांनी काम पाहिले. प्रीमियरचे प्रमुख म्हणून बी. डी. रॉय यांनी आपली भूमिका पार पाडली. स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी संघटनेचे खजिनदार सुनील ढगे, अनिल जाधव, मुकुंद झनकर, सर्वेश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सन 2022-23 या वर्षासाठी खेळाडूंची नावनोंदणी सुरू झालेली असून, दि. 1 जून ते 31 जुलै 2022 या कालावधीत खेळाडूंनी आपली नोंदणी करावयाची आहे. त्यासाठी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT