उत्तर महाराष्ट्र

नाशिक : एलआयसी कर्मचार्‍यांची आयपीओविरोधात निदर्शने

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : एलआयसीच्या आयपीओला विरोध दर्शविण्यासाठी विमा कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी (दि.4) जीवनप्रकाश विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध नोंदविला.

यासंदर्भात विमा कर्मचारी संघटनेने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात सरकारने साडेतीन टक्के मालकी कमी करणे याचा अर्थ आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचे म्हटले आहे. देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या हिताचा विचार करता केवळ भागधारकांच्या फायद्याचाच यामध्ये विचार करण्यात आला असून, शेअर्सची किंमत अत्यंत कमी ठरविल्याने महामंडळाच्या संपत्तीची लूट करण्यात येत असल्याचा आरोप विमा कर्मचारी संघटनेने केला आहे. निदर्शनाआधी झालेल्या द्वारसभेला संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कांतीलाल तातेड, उपाध्यक्ष मोहन देशपांडे, सरचिटणीस अनिरुद्ध देशपांडे, योगेश कासार, प्रिया जोशी, अजय डोळस, महेश डांगे, अनघा यार्दी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT