उत्तर महाराष्ट्र

नाशिक : विवाहसोहळ्यांमध्ये चोरट्यांची हातसफाई, माजी महापौरांच्या पत्नीचे दागिने खेचले

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विवाहसोहळे सुरू झाले असून, मंगलकार्यालये, लॉन्समध्ये विवाह होत आहेत. या ठिकाणी चोरटेही वावरत असून, ते संधी मिळताच चोर्‍या करीत आहेत. चोरट्यांनी यावेळी माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नीच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे दागिने खेचून पळ काढल्याची घटना लंडन पॅलेसजवळ घडली.

हितेश यतीन वाघ (रा. शालिमार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि. 8) सकाळी 10.15च्या सुमारास लंडन पॅलेस कॉर्नर येथे विवाहसोहळ्यास आल्या होत्या. वधू-वरांना भेटून त्या विवाहस्थळावरून बाहेर आल्या व कारमध्ये बसत होत्या. त्यावेळी अंदाजे 20 ते 22 वयोगटातील चोरट्याने हितेश यांच्या गळ्यातील साडेआठ तोळे वजनाची पोत व चेन खेचून नेली. घटनास्थळापासून काही अंतरावरच दुसरा चोरटा दुचाकीवर बसलेला होता. दागिने घेऊन पळालेला चोरटा या दुचाकीवर बसला आणि दोन्ही चोरटे सर्व्हिस रोडवरून द्वारकाच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही औरंगाबाद रोडवरील मंगल कार्यालये, लॉन्समध्ये चोरट्यांनी 1 व 5 डिसेंबरला चोरी करून सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यात सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा ऐवज होता. या घटनांतून चोरट्यांनी वधू-वराच्या जवळच्या नातलगांवर लक्ष ठेवल्याचे दिसत असून, त्यांचे लक्ष विचलित करून किंवा लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे डाव साधत असल्याचे दिसते. चोरीच्या एका घटनेत चोरटा कैद झालेला असून, पोलिस अधिक शोध घेत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT