जूने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुने नाशिक परिसरातील दहिपूल भागात टोळक्याने परिसरात दगडफेक, तोडफोड करीत एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी घडली.
दगडफेकीत दहिपुलावरील काही दुकानांचे नुकसान झाले, तर वाहनांचीही तोडफोड झाली आहे. टोळक्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केला आहे. परिसरात दगडांचा खच, काचांचे तुकडे व रक्ताचा सडा पसरलेला होता. या घटनेने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.
या प्रकरणातील संशयित आरोपींना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची आज दहीपूल भागातून धिंड काढण्यात आली. यावेळी आरोपीं सोबत घटनास्थळी जाऊन स्पॉट वेरिफिकेशन केल्याचे पोलीसांनी सांगितले.