उत्तर महाराष्ट्र

नाशिक : साधू महतांचे कुशावर्तासह बिल्वतिर्थावर स्नान

गणेश सोनवणे

नाशिक, त्र्यंबकेश्वर :

सूर्यग्रहण पर्वकाल साधण्यासाठी मंगळवार दि. (25) आखाड्याच्या साधुमहंतांनी बिल्वतीर्थावर स्नान केले. महामंत्री हरिगिरी महाराज यांनी साधूंना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत विविध आखाडयांचे साधू ग्रहणस्पर्श होण्यापूर्वी हर हर महादेव असा जयघोष करत शाही पर्वणी प्रमाणे आखाडयाची देवता घेऊन बिल्वतीर्थावर आले. बिल्वतीर्थ हा प्राचीन तलाव नीलपर्वत'च्या पाठीमागच्या बाजूस आहे. हा तलाव त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे. सर्व साधूंचे येथे मंदिराचे विश्वस्त भूषण अडसरे यांनी स्वागत केले.

साधूंना ओवाळले तसेच यावेळेस त्यांनी बिल्वतीर्थाच्या मध्यभागी 51 फुट उंच पावर्तीमातेची मूर्ती बसविण्याचा संकल्प केला. तसेच बिल्वतीर्थास प्राचीन स्वरूप देत जिर्णोध्दार करणे, घाटांचा विकास करणे आदी संकल्प यावेळेस करण्यात आले. येथे जुना आखाडयाचे पुरोहित त्रिविक्रम जोशी, पुरोहित संघ कार्याध्यक्ष मनोज थेटे, माजी विश्वस्त जयंत शिखरे, मोहन लोहगावकर या ब्रह्मवृंदांनी मंत्रघोष करत आखाडयाच्या देवतांचे पूजन केले. त्यानंतर सर्व साधूंनी व भक्तांनी स्नान केले. स्नान झाल्यानंतर महंत हरिगिरी महाराज यांच्यासह काही साधूंनी पाण्यात उभे राहून मंत्रजप केला. ग्रहणमोक्ष झाला त्यानंतर पुन्हा देवतांची पुजा आरती केली आणि साधु आखाडयात परत फिरले.

यावेळेस आखाडा परिषद महामंत्री महंत हरिगिरी महाराज, महंत शंकरानंद महाराज, श्रीमहंत नारायण गिरी महाराज, महंत गणेशानंद महाराज, महंत गिरिजा नंद महाराज, सहजानंद महाराज, सुखदेवगिरी महाराज, विष्णूगिरी महाराज, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यासहसाधुसंत पुरोहित भक्त उपस्थित होते. मंदिर ट्रस्टच्या वतीने येथे स्नानासाठी व पूजेसाठी सुविधा उपलबद्ध करण्यात आली. प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, अमोल माचवे, अमोल टोकेकर, हेमंत गांगुर्डे आदीसह कर्मचारी येथे उपस्थित रहिले.

ञ्यंबकेश्वर मंदिरात ग्रहण कालावधीत देवस्थानची पूजा सुरू होती. तत्पुर्वी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रदोषपुष्प पूजक उल्हास आराधी यांनी शृंगार पुजा केली. त्याचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले. ग्रहण कालावधीत कुशावर्तात उभे राहून साधकांनी साधना केली. ग्रहणमोक्ष होताच कुशावर्तावर स्नानसाठी गर्दी उसळली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT