उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पूर्वपरवानगी न घेता शहरात वास्तव्य केल्याने तडीपार गुंडास अटक

गणेश सोनवणे

नाशिक : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे.

सागर गणपत बोडके (२२, रा. फुलेनगर) असे या गुंडाचे नाव आहे. सागर याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, हाणामारी, चोरी असे आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यास फेब्रुवारी २०२१ मध्ये तडीपार केले होते. मात्र, तरीदेखील त्याने पूर्वपरवानगी न घेता शहरात वास्तव्य केले. त्यामुळे त्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT