उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रिक्षा प्रवासात महिलेने वृद्धेकडील दागिने केले लंपास

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिक्षा प्रवासात एका महिलेने वृद्धेकडील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सावित्रीबाई परशराम झनकर (65, रा. पार्कसाईड, हनुमाननगर) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

झनकर या शनिवारी (दि.21) दुपारी हनुमाननगरहून कपालेश्वर नगरच्या दिशेने रिक्षाने जात होत्या. त्यावेळी सहप्रवासी म्हणून बसलेल्या महिलेने झनकर यांच्याकडील 64 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT