नंदुरबार - जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्यांचे पत्र देत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्थेच्या कारभारातील अनेक शंकास्पद गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर माहिती देताना त्यांनी चौकशीची मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
असलेल्या परप्रांतीय विदयार्थ्यांना स्थानिक मुस्लीम लोकांचे सिमकार्ड का दिले जातात? या शिवाय अक्कलकुवा येथील जामिया नगर, इरफान नगरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत 2500 मुस्लीम नागरीकांचे मतदारयादीत नांव कसे आले ? संस्थेमार्फत संस्थेच्या ज्या-ज्या जागेवर ईमारती उभ्या आहेत. त्या सर्व जमिनी या आदिवासी समाजाच्या नावे आहेत. याची चौकशी व्हावी. संस्थेमार्फत वेगवेगळया प्रांतातुन आलेले मुलं, विदयार्थी गायब कसे होतात. याची देखील चौकशी व्हावी; असे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याचा संदर्भ असा की, नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम या संस्थेचे चेअरमन गुलामअली वस्तानवी व त्याचा मुलगा हुजेफा वस्तानवी यां दोघांनी संगनमत करुन येमन या देशाचा परकीय नागरीक खालेद इब्राहिम सालेहर अल-खदामी याला बेकायदेशीर अनाधिकृत आश्रय दिला. या प्रकरणी पोलीसांनी संस्थेचे चेअरमन गुलामअली वस्तानवी व येमन देशाचा नागरीक खालेद इब्राहिम सालेहर अल-खदामी याच्यासह पदाधिकारीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी विजय चौधरी यांनी पत्रकार परीषद घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी केली होती की, तात्काळ जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम या संस्थेवर छापा घातला पाहिजे, कसुन चौकशी केली पाहिजे. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने या संस्थेवर जवळपास 200 पोलिसांचा ताफा घेऊन छापा घातला.
त्याविषयी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत माहिती देताना सांगितले की, 6 तास या संस्थेच्या भव्य इमारतींमध्ये पथकांनी तपासणी केली. पोलीसांनी संशयास्पद हालचाली आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या. काही संशयास्पद कागदपत्रे देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
विजय चौधरी यांनी पुढे सांगितले की, येमेनचा संशयास्पद नागरिक खालेद इब्राहिम सालेहर अल-खदामी याला विनाविलंब त्याच्या परीवारातील लोकांसह अटक केली पाहिजे. जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्थेमध्ये असलेल्या परप्रांतीय विदयार्थ्यांना स्थानिक मुस्लीम लोकांचे सिमकार्ड का दिले जातात ? या शिवाय अक्कलकुवा येथील जामिया नगर, इरफान नगरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत 2500 मुस्लीम नागरीकांचे मतदारयादीत नांव कसे आले? हे 2500 मुस्लीम नागरीक कुठले आहे. त्यांचेकडे आधार, पॅन व राशनकार्ड कुठुन आले. याशिवाय अक्कलकुवा मध्ये मोठया प्रमाणात परकीय देशाचे नागरीक आहेत याची देखील चौकशी झाली पाहिजे. तसेच या जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्थेत आलेल्या विदयार्थ्यांना कराटे व कुंग फु प्रशिक्षण देण्याचे प्रयोजन काय आहे ?
जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्थेच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक सह देशभरात विविध शाखा आहे. त्याठिकाणी अशी किती विदेशी पाकीस्तानी, बांग्लादेशी नागरीक बेकायदेशीर राहत आहेत. त्याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे प्राप्त माहितीनुसार, शैक्षणिक कामासाठी या संस्थेला मिळणारा निधीचा गैरवापर सुरु आहे. जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्थेचे चेअरमन गुलामअली हे देशभरामध्ये मोठया प्रमाणात मशिदी बांधण्यासाठी करोडो रुपयांची फंडींग करतात. यांच्या फंडींगमुळे भारतात ठिकठिकाणी मशिदी उभ्या राहिल्या. या जामिया ईस्लामिया संस्थेच्या आश्रयाने राहत असलेल्या विदेशी नागरीकांचा देशविरोधी कारवाईत सहभाग आहे का ? याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली आहे, असेही विजय चौधरी पुढे म्हणाले.