नंदुरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क | नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं थैमान घातले असून सोमवार (दि.5) रोजी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे कैरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून खराब झालेल्या कैरीमुळे उत्पादनात घट झाली आहे.
शेकडो हेक्टर वरील कैरीचं नुकसान झाल्याने लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कैऱ्यांवर परिणाम होणार असून आमचूर उद्योगाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रविवार, दि. ४ मे पासून अवकाळी पावसाची सुरुवात झाली असून, मंगळवार (दि.6) रोजी आणि बुधवार (दि.7) रोजी देखील तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना आणि गारपिटची शक्यता असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे.