Couple Commited  Sucide In Nandurbar
तापी नदीत उडी घेत प्रेमी युगलाने संपवले जीवन Pudhari File Photo
नंदुरबार

नंदुरबार : नदीत उडी घेत प्रेमी युगुलाने संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार शहरातील एका प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली. तापी नदीच्या पुलावरून उडी घेत जीवन संपवल्याची घटना रविवारी (दि.14) उघडकीस आली आहे. शनिवारी रात्रीपासून दोघेही बेपत्ता झाले होते. धीरज भाईदासभाई मराठे (वय 26) आणि वैष्णवीबेन अनिलभाई मराठे (वय 20) असे मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एक तरुण आणि एक तरुणी शनिवारी (दि.13) पासून बेपत्ता असल्यामुळे त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, रविवारी (दि.14) गुजरात हद्दीतील जुना कुकरमुंडा शिवारात तापी नदीच्या पात्रात दोन मृतदेह आढळून आले. स्थानिक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन मृतदेह बाहेर काढण्याची तजवीज केली. यातील मयत तरुण नंदुरबार शहरातील धीरज मराठे तर, मयत तरुणी वैष्णवीबेन अनिलभाई मराठे (वय 20) असल्याचे निष्पन्न झाले.

तापी नदीच्या पुलापासुन जवळच मृतदेह आढळून आल्याने दोघांनी सोबतच आत्महत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. यासंदर्भात निजर तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत वैष्णवी मराठे हिचा रविवारी विवाह होणार होता. परंतु, त्याच्या आधीच ही दुर्घटना घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धीरज आणि वेष्णवी यांचे प्रेम संबंध होते. तथापि त्यांच्या लग्नाला विरोध होता. म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याची सर्वत्र चर्चा आहे.

SCROLL FOR NEXT