Nandurbar tribal students exam
नंदुरबार : वाड्या पाड्यातील आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षांचे सराव व्हावे, या उद्देशाने 'दै. पुढारी' तर्फे राबवल्या जाणाऱ्या टॅलेंट सर्च अभियाना अंतर्गत आज (दि. 20) नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 4 हजार आदिवासी मुलांनी स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवले. नंदुरबार जिल्ह्यातील बहुदा हा पहिला उपक्रम असावा.
आश्रम शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना आधुनिक शिक्षण प्रवाहात आणण्याच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून तयार करण्याच्या उद्देशाने दै. पुढारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत आज ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रम शाळांमधून ही परीक्षा पार पडली. इयत्ता चौथी पाचवी सहावी व सातवीच्या सुमारे 4000 विद्यार्थी विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. जमिनीवर बसून तन्मयतेने प्रश्नपत्रिका सोडवणारे विद्यार्थी विद्यार्थिनी देखील याप्रसंगी पाहायला मिळाले.
यादरम्यान, नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षणचे नंदकुमार साबळे यांनी व शिक्षण विस्तार अधिकारी श्री व्ही व्ही सोनार यांनी शासकीय प्राथमिक आश्रम शाळा ठाणेपाडा शाळेला भेट देऊन पाहणी केली. कोणत्याही शाळेतील विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आर. एन. निकम, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच शिक्षक व शिक्षिका यांनी दक्ष राहून परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. दैनिक पुढारीचे वितरण व्यवस्थापक अशोक पाटील यांनी परीक्षा व्यवस्थापन हाताळले