नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार शहरात दोन अवैध हुक्का पार्लर सुरु होते. यावर शहर पोलिसांनी धाड टाकून कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हुक्का पार्लरवर हुक्का ओढणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांसह १० जणांवर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.
नंदुरबार शहरातील भतवाल टॉकीज परिसरातील दोन सोशल क्लबवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. शनिवारी (दि.20) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहुन सुमारे २५ ते ३० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संशयितांमध्ये नंदुरबार शहरातील प्रतिष्ठीतांचाही समावेश आहे. अधिक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक किरणकुमार खेडकर यांच्या पथकाने केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश भदाणे, पी.एस.आय. भुवनेश मराठे, हे.कॉ. मुकेश तावडे, पोलीस नाईक राकेश मोरे, अविनाश चव्हाण, दादाभाई मासुळ, मोहन ढंमडेरे, पो.कॉ. विजय धिवरे, पो.कॉ. आनंदा मराठे, पोलीस नाईक रमेश साळुंखे, पो.कॉ. किरण मोरे, अनिल बडे, राहुल पांढारकर यांचाही कारवाईत समावेश होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरात हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किक्षरणकुमार खेडकर यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक खेडकर यांनी आपल्या पथकासह हुक्का पार्लरवर रात्री धाड टाकली. या हुक्का पार्लरमध्ये १० ते १२ जण टेबल, बिअरचे टीन, हुक्क्यासाठी लागणारी फ्लेवर आणि साधनसामुग्री जप्त करण्यात आली.
पोकॉ. अभय शशिकांत राजपूत यांच्या फिर्यादीवरुन हुक्का पार्लर चालविणारा अक्षय सतिष चौधरी, हुक्का पार्लरमधील साहित्य पुरविणारे कामगार प्रतिक धरमसिंग नाईक (रा. मोरंबा, ता. अक्कलकुवा), राकेश दिलीप ठाकरे (रा. फुलसरा, ता.जि. नंदुरबार) यांच्यासह हुक्का पिण्यासाठी आलेले ग्राहक निखील रमेशलाल गुरुबक्षाणी (रा.जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार), रोहीत सुनिल वासवानी (रा. वृंदावन कॉलनी, नंदुरबार), अमन दिलीपकुमार बालाणी (रा. नवी सिंधीकॉलनी, नंदुरबार), पंकज मेघराजमल कुकरेजा (रा. सिंधीकॉलनी, नंदुरबार), अमोल श्यामकुमार बष्णीक (रा.जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार), विक्की महेश बालाणी (रा.बाबा गरीबदास नगर, नंदुरबार), योगेश कन्हैयालाल तेजवाणी (रा. जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार) यांच्यासह दोघां अल्पवयीन मुलांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय बागूल करीत आहेत.