नंदुरबार : येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त 10 ऑगस्ट 2025 पासून चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गावित म्हणाल्या, जिल्हा निर्मितीनंतरच्या 26 वर्षात प्रथमच नंदुरबार येथे इतक्या मोठ्या स्पर्धा घेण्यात येत असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत. व्हॉलीबॉल स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी राहतील. इच्छुक क्रीडापटूंनी 9 ऑगस्टपर्यंत धनराज अहिरे यांच्याकडे विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावीत, आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामणे आदींनी केले आहे.