नंदुरबार

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अश्विनी सानप नियुक्त

श्रवण दत्त यांची ॲडिशनल डीजीपी कार्यालयात बदली

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पुणे लोहमार्गाच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची नियुक्ती झाली असून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला बऱ्याच वर्षानंतर महिला पोलीस अधीक्षक लाभणार आहे. दरम्यान, नंदुरबारचे विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची एडीजेपी स्पेशल एक्शन म्हणजे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर पदी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या संदर्भात शासकीय आदेश पारित केला आहे. त्यात म्हटले आहे की, पोलीस आस्थापना मंडळ यांच्या शिफारशींचा विचार करुन भारतीय पोलीस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांच्या स्टाफ ऑफिसर पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून लोहमार्ग पुणे येथील पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT