नंदुरबार : नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीने आता गती घेतली असून प्रभाग क्रमांक एक मधील एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार कुणाल वसावे आणि ज्योती राजपूत या विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुद्धा शिंदे गटाने दोन जागा जिंकल्या असून दीपक कटारिया आणि टीना ठाकूर विजयी घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने पहिले खाते उघडले आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या शिंदे गटाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी आतापर्यंतच्या मतमोजणीत आघाडी घेतली आहे. नंदुरबार येथे भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली होती. याचबरोबर तळोदा येथे सुद्धा शिंदे गटाच्या शिवसेनेने खाते उघडले आहे.