Crime News pudhari photo
नंदुरबार

Nandurbar Crime | नंदुरबार: घराची तोडफोड आणि वाहनाची जाळपोळ; पोलिसांच्या कारवाईमुळे स्थिती नियंत्रणात

Namdev Gharal

नंदुरबार - घराची तोडफोड आणि वाहन जाळण्याची घटना येथील पटेलवाडी भागात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणे सुरू असून संशयीतांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

अधिक वृत्त असे की, नंदुरबार शहरातील पटेल वाडी भागात आज दिनांक 28 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारनंतर अचानक येऊन जमावाने एका घराची तोडफोड केली. तसेच एक दुचाकी पेटवण्यात आली. तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली. तथापि घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने धाव घेतली. स्थिती नियंत्रणात आणली. एका जुन्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. उपनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली तसेच संशयतांची धरपकड करणे सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT