नंदुरबार : विना हॉलमार्क सोने विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून तपासणी करण्यात आल्यामुळे आज नंदुरबार येथील बाजारात खळबळ उडाली.
नंदुरबार शहरात हॉलमार्कशिवाय सोने विक्री होत असल्याची तक्रार भारतीय मानक ब्युरो विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सहाय्यक संचालक कुंजन कुमार आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले असता त्यात तीन दुकानांवर विनाहॉलमार्क सोने विक्री होत असल्याचे आढळून आले. म्हणून या तीनही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पथकाकडून देण्यात आली. तिन्ही कारवाईंमध्ये सुमारे 900 ग्रॅम सोने हॉलमार्कशिवाय आढळून आल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने जप्ती केली.