File Photo
नंदुरबार

नंदुरबार : पुन्हा हिट अँड रन ; आधी दुचाकीला नंतर महिलेला उडवले ; एकाचा मृत्यू

Nandurbar Accident News |

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील 'हिट अँड रन'ची घटना ताजी असतानाच शहादा येथील प्रकाशा रस्त्यावर एका महेंद्र स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक देत दुचाकी स्वाराला आणि पायी चालणाऱ्या महिलेला उडवले यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे.

शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावर हॉटेल गुलमोहर समोर सार्वजनिक जागी. दि. २६/०२/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा. हा अपघात घडला. याप्रकरणी किरण नरोत्तम पाटील वय-४८ व्यवसाय-व्यापार रा. प्लॉट क्र. १८ शांतीनगर शहादा ता. शहादा यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, त्यांचे सासरे म्हणजे सुरेश गोविंद पाटील वय ६५ रा. परिमल कॉलनी शहादा हे त्यांची बजाज प्लॉटीना मो. सा. क्र. MH- १८ CD- ६०६६ हिने शहादा येथुन प्रकाशा कडे जात असतांना गुलमोहर हॉटेल समोर मागुन महिंद्रा स्कार्पिओ गाडी क्र. DD-०१ ८-८०७८ वेगाने आली आणि मागून जोरदार धडक दिली. त्याचवेळी रस्त्यावर पायी चालणाऱ्या कविता आण्णा निकुंभ वय - ३५ रा. शहादा ता. शहादा या महिलेला देखील मागून धडक देत महिंद्रा चालकाने उडवले. यात दुचाकी चालक सुरेश पाटील यांचा मृत्यू झाला तर पायी चालणारी महिला कविता निकुंभ या गंभीर जखमी झाल्या.


रस्त्याच्या परिस्थतीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने गाडी चालवुन कारणीभुत झाला व पायी चालणारे महिलेस गंभीर दुखापती केले म्हणून चालक शिवशंकर धरमराजसिंग वय २६ वर्ष रा. फ्लॅट नं. १०१ एच -१ योगी मिलन उल्टन फालिया सेल्वास दादर नगर हवेली याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT