पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली Pudhari
नंदुरबार

Nandurbar Drought | पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

पालकमंत्री मुश्रीफ यांनी नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली

पुढारी वृत्तसेवा

Guardian Minister Hasan Mushrif Drought Inspection

नंदुरबार : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध आहे. त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्य:स्थिती, नुकसानीची व्याप्ती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी बंडू कापसे, तहसीलदार संतोष ढेरे आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना मुश्रीफ म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत.

जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी असून, त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT