प्रातिनिधिक छायाचित्र   File Photo
नंदुरबार

अवैध मद्यासह तब्बल 92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; नंदुरबार एलसीबीची कारवाई !

नंदुरबार एलसीबीने केलेली लागोपाठ दुसरी कारवाई असून कालच 28 लाखांचा साठा जप्त केला होता.

पुढारी वृत्तसेवा

Goods worth Rs 92 lakh including illegal liquor seized; Nandurbar LCB takes action!

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

अवैध मद्यासह तब्बल 92 लाख रुपयांचा मुद्देमाल नवापूर तालुक्यात जप्त करण्यात आला. नंदुरबार एलसीबीने केलेली लागोपाठ दुसरी कारवाई असून कालच 28 लाखांचा साठा जप्त केला होता.

या विषयी अधिक माहिती अशी की, रायपुर ता. नवापुर येथील भावीन कोकणी हा त्याच्या घराच्या जवळ असलेल्या शेताला लागुन वनामध्ये अवैधरित्या दारुचा साठा साठवुन त्याची वाहनामध्ये वाहतूक करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दि. 24/04/2026 रोजी मिळाली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी लगेच पथकास कार्यरत केले. पथकाने भावीन कोकणी याच्या घराजवळील शेताजवळ असलेल्या लहान टेकडीच्या शेजारी झाडाझुडपातील खाचेच्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम व वाहने असे जमिनीवर ठेवलेल्या दारु सहित दिसून आले.

सदर इसमांना पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने ते तेथून पळ काढत असतांना पथकाने एका इसमाला ताब्यात घेतले. धर्मेश मंगु धोडी, (वय 36 वर्षे), रा. एकलारा, जि. वलसाड, गुजरात असे त्याचं नाव आहे. सदरचा माल हा भाविन कोकणी याचा असल्याचे त्याने सांगितले. सदर ठिकाणी एकूण 4 चारचाकी वाहने मिळुन आली असून त्यांचे क्रमांक याप्रमाणे- MH 04 FZ 6698, GJ 19 BE 8109 , GJ 02 CL 1254 , MH 39 J 3000 असे आहेत.

सदर ठिकाणाहुन एकुण 92 लाख 78 हजार 460 रुपये किमतीचा अवैध दारुचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द नवापुर पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकॉ जितेंद्र तांबोळी, जितेंद्र तोरवणे, बापु बागुल, नितीन गांगुर्डे, दिनेश चित्ते, मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, अजित गावीत, सचिन वसावे अशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT