मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते भूमीपूजन pudhari photo
नंदुरबार

नंदुरबारमध्ये साकारणार पहिले प्रशस्त तालुका क्रीडा संकुल

मंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार - तालुका क्रिडा संकुलाची जागा नंदुरबार शहरात चांगली आणि मोक्याच्या ठिकाणावर आहे. मात्र ती अनेक वर्षांपासून पडीत स्वरूपात ठेवली गेली होती. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे त्या जागेवर आता नंदुरबार जिल्ह्यातील पहिले भव्य प्रशस्त क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमीपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते पार पडले. नंदुरबार तालुका क्रिडा संकुलासाठी शासन धोरणाप्रमाणे पाच कोटी तर व्यापारी संकुलासाठी 20 कोटी 17 लाख 23 हजारांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून याठिकाणी एकत्रीत असे जवळपास 25 कोटी रुपये खर्चुन अद्यावत असे तालुका क्रिडा संकुल आणि त्याचे व्यापारी भवन उभे केले जाणार आहे. तालुका क्रिडा संकुलाची जागा चांगली आणि मोक्याच्या ठिकाणावर आहे. मात्र ती अनेक वर्षांपासून उपयोगात आणता आली नाही. आता ती खेळांडूसाठी उपयोगात आणण्याची गरज यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केली.

या ठिकाणच्या संकुलात 200 मीटरच्या अद्यावत ट्रॅकसह, बॅडमिंटनचा हॉल, मुव्हेबल बास्केट बॉलचे कोर्ट, कब्बडी आणि खो-खो साठीचे मैदान देखील तयार करण्यात येणार आहे. यासाठी वास्तुविशारदांनी अतिशय उत्तम आणि आकर्षक इमारतीसह मैदानाचे डियाईन तयार केले आहे. नंदुरबारच्या नागरीकांना याठिकाणी वॉकसाठीची उत्तम सोयदेखील होईल. या क्रिडा संकुलाच्या व्यापारी संकुलात क्रिडा संघटनांसाठी भाडे तत्वावर गाळे देखील उपलब्ध करुन देण्याच मानस असल्याचे यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले.अत्यंत आकर्षक,खेळाच्या अनुषंगाने सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असणारे नंदुरबार तालुका क्रिडा संकुल शहरातील आणि ग्रामीण भागातील खेळाडू, नागरीकांचे आरोग्य मंदिर बनेल, असा विश्वास राज्याचे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, तहसिलदार मिलींद कुलथे, हरिभाई पाटील. जे.एन. पाटील मोहन खानवाणी,प्रा. ईश्वर धामणे, लक्ष्मण माळी, बळवंत निकुंभ, संजय होळकर, संतोष वसईकर, यांच्यासह पुरस्कार प्राप्त क्रिडा प्रशिक्षक,खेळाडू आणि विद्यार्थ्यांसह परिसरातील व्यापारी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT