नंदुरबारला वराहांची कत्तल करण्याचे आदेश pudhari file photo
नंदुरबार

नंदुरबारमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू; डुक्करांची कत्तल करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : तालुक्यातील आष्टे गावात झालेल्या वराहांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फिवरनेच झाला असून यावर भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज म्हणजे प्राणी रोग अन्वेषण प्रयोग शाळेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील दहा किलोमीटरचा परिसर बाधित घोषित करण्याबरोबरच वराहांची कत्तल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी याविषयी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, सदर रोग जलदगतीने पसरणारा अधिसुचित रोग असल्याचे दिसून आले आहे. जिल्हयामध्ये आफ्रिकन स्वाईन या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संबंधीत विभागांना उपयायोजना करण्याची सूचना करताना स्पष्ट सांगितले आहे की, बाधित क्षेत्राचा एक किमी परिसरातील सर्व वराहांचे कलींग करुन त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावून त्या परिसराचे निर्जंंतुकीकरण करावे. (0.008% सोडीयम हायड्रोक्साईड, हायपोक्लोराइंट -2.3% क्लोरीन, 0.03% फॉरमॅलीन आयोडीन कंपाउंडस)

तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश 

आफ्रिकन स्वाईन फिवर (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रिय संनिरक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मृत्यूवर बारकाईने लक्ष ठेवावे. वराहाच्या मासांची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देवून नियंत्रण ठेवावे. तसेच मोकाट पध्दतीने होणारे वराह पालन टाळावे.

अशा आहेत सूचना...

सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्त दृष्ट्या योग्य रितीने विल्हेवाट लावावी. वराहपालन करणारे पशुपालक या व्यवसाया संबंधित व्यक्ती (उदा. व्यापारी, कसाई, वितरक ईत्यादी) यांच्यामध्ये या रोगाविषयी जागृकता निर्माण करुन रोगाच्या प्रादुर्भावा विषयी सुचना देणे व सुप्त संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे असेही सूचित करण्यात आले आहे.

घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहीलेले अन्न वराहांना देणे ही याच विषाणुच्या प्रसारास मुख्यत्वे करुन कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येवू देवू नये.
जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, नंदुरबार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT