नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ येथे पूजा अर्चा करताना कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकोटे Pudhari News Network
नंदुरबार

Manikrao Kokate: 'इडा पिडा टळू दे' ! साडेसाती मुक्तीसाठी कृषीमंत्री कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन

Shani Sade Sati Mukti Sthan: नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर येथे कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा केली.

पुढारी वृत्तसेवा

  • राजकीय कारकीर्दीत आलेली इडा पिडा टाळण्यासाठी ॲड. माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी लीन झाले आहेत.

  • नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर येथे कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा केली.

  • शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होते, अशी अनेकांची भावना आहे.

Manikrao Kokate Shani Temple Visit Nandurbar

नंदुरबार : संकटामध्ये सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता शनिदेवाच्या चरणी धाव घेतली आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. देशातील एकमेव शनी देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमंडळ येथील शनी मंदिरात कोकाटे यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा केली.

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून म्हणून ओळख आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून म्हणून ओळख आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केले आहे. शनी देव हा राजकीय क्षेत्राचा गुरु मानला जात असल्याने त्यामुळे अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत. संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळते, अशी भावना आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात या शनिश्वराच्या दर्शनाने केली होती, असे सांगितले जाते. मंत्री विजयकुमार गावित, खासदार हिना गावित अशा अनेक राजकीय नेत्यांनी देखील येथील शनी मंदिराचे दर्शन घेतलेले आहे.

आपल्या मागची इडा पिडा टळावी, यासाठी राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आता थेट शनिदेवाला साकडंच घातलं आहे, त्याचबरोबर शनिमांडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT