रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरल्याची बातमी मिळताच पोलिसांसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली pudari news network
नंदुरबार

नंदूरबारला मालगाडी घसरली अन् पोलिसांसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली

अंजली राऊत

नंदुरबार : शहरापासून १० ते १५ किलोमीटरवर असलेल्या रनाळे जळखे परिसरात रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरल्याची बातमी शुक्रवारी (दि.27) दुपारी आली आणि यंत्रणेची धावपळ उडाली. पोलिसांसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व विभाग आपआपल्या पध्दतीने कार्यरत झाले असताना हा यंत्रणेची तयारी पाहण्यासाठी केलेला सराव असल्याचे नंतर उघड करण्यात आले अन् सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

रनाळे जळखे परिसरात रेल्वे रुळावरुन मालगाडी घसरल्याची बातमी शुक्रवारी दुपारी आली पोलिसांसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली सर्व यंत्रणा पोहचल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ स्तरावरुन याठिकाणी सराव घेण्यात आल्याचे समजले.

रेल्वेमार्गावर नंदुरबारपासून सुरतच्या दिशेने निघालेल्या एका मालगाडीचे डबे घसरल्याच्या बातमीने यंत्रणेची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. ही मालगाडी इंधन वाहून नेणारी असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, रेल्वेचे अधिकारी, लोहमार्ग पोलीस घटनास्थळाकडे तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रनाळे जळखे गावानजीक असलेल्या बोगद्याजवळ मालगाडी शुक्रवारी (दि.27) दुपारी तीन वाजेपासून उभी करण्यात आली. याठिकाणी सर्व यंत्रणा पोहचल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ स्तरावरुन याठिकाणी सराव घेण्यात आल्याचे समजले. त्यामुळे यंत्रणांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला.

मुळात सध्या रेल्वे रुळावर होत असलेले घातपात आणि अपघात पाहता माहिती मिळताच सर्व यंत्रणा किती सतर्क होवून घटनास्थळी पोहचतात, याची तपासणी या सरावातून झाली. गोपनीय पद्धतीने घेतलेल्या या चाचणीबद्दल सर्वांना सुखद धक्का बसल्याचे यावेळी पहावयास मिळाले. तब्बल दोन तासानंतर थांबवण्यात आलेली इंधन मालगाडी नंतर सुरतकडे रवाना झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT