जळगाव

राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याने मी भाजपचा प्रचार करायला मोकळा : एकनाथ खडसे

गणेश सोनवणे

जळगाव- मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे मी आता कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यास मोकळा झालो असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी आज खडसेंचा आशिर्वाद घेत रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, प्रसंगी खडसे माध्यमांशी बोलत होते.

खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी आज एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेऊन नामनिर्देशन पत्र भरले. खडसे म्हणाले, मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मात्र मी अद्यापही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. जळगाव व रावेर अशा दोघे उमेदवारांना शुभेच्छा देतो. अधिकाधिक मतांनी ते निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यास मोकळा झालो असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले.

SCROLL FOR NEXT