जळगाव

जळगाव | १४ लाखांचा गुटखा जप्त ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गणेश सोनवणे

जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या वाहनातून 14 लाखांचा गुटखा आय जी च्या पथकाने पकडला. याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 11 रोजी रात्री अकरा वाजेचया सुमारास धुळ्याकडून मेहुणबारे मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे एका वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी नाशिक आय जी यांच्या विशेष पथकात पोलीस निरीक्षक शकील अहमद, अजय महाजन, हवालदार मिलिंद पाटील, पोना प्रमोद मंडलिक यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार रात्री अकरा वाजेच्या सुमारास एमएच २० जीसी. ५५७३ या क्रमांकाच्या कंटेनरला थांबून त्याची तपासणी केली असता या कंटेनर मधून १४ लाख ३९ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा व ४ लाख रुपयांचा कंटेनर असा सुमारे १८ लाख ३९ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी कंटेनरचालक गोपी अशोक मंडोरे (२९ रा. दत्त मंदिरजवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, सध्या रा. नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) व विवेक बन्सीधर कुलकर्णी (४०, रा. सिडको, वाळूज महानगर, गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तर शंकर गरूड रा. साजापूर एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर, व्यापारी संजय माटा आणि दिपीक वालिचा दोघे रा. सेंधवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT