जळगाव : गरोदर मातांना प्रसूतीसंदर्भात कोणतीही अडचण भासू नये आणि त्यांची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सक्षम संस्थेतच व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून टोल फ्री क्रमांक 8237353193 कार्यान्वित करण्यात आला आहे.
237353193 या क्रमांकावर 24x7 मदत उपलब्ध :
प्रसूतीची तारीख जवळ असताना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास
रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असल्यास
आवश्यक औषधे व उपचार उपलब्ध नसल्यास
गरोदर माता व त्यांचे कुटुंबीय अशा येत असलेल्या अडचणींवर या टोल फ्री सेवेद्वारे मदत मिळवू शकतात
सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाने 2,500 अपेक्षित प्रसूतींची यादी तयार केली होती. त्यापैकी सुमारे 2,012 गरोदर मातांशी थेट फोनवर संपर्क साधून विचारपूस करण्यात आली.
नागरिकांनी या सेवेला सक्रिय प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुसार टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव जिल्हा परिषद कडून करण्यात आले आहे.
गरोदर मातांची सुरक्षित प्रसूती व योग्य आरोग्य सेवा हा आरोग्य विभागाचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही या सुविधेमुळे आरोग्यसेवा सहज उपलब्ध होईल.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, नाशिक