गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तरुणाचा मृत्यू pudhari photo
जळगाव

Jalgaon | गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : नवरात्रोत्सव म्हटला की, गरबा हे समीकरण ठरलेलं. सध्या नवरात्रीमुळे जिल्ह्यातही गरबा खेळण्यासाठी विविध मंडळांनी आयोजन केलेले आहे. मात्र, अशातच एक दुर्देवी घटना घडली आहे. पाचोरा येथे गरबा खेळताना 27 वर्षाच्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे.

पाचोरा येथे २७ वर्षीय युवक लखन रमेशलाल वाधवानी नवरात्र उत्सव सुरू झालेला असल्याने गरबा खेळण्यासाठी एका मंडळात गेला होता.

त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजेला घडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT