जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहचले. त्यानी परिस्थितीचा आढावा घेत परिस्थिती हाताळली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटनास्थळी थांबून होते.
मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून. जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटल मध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी आमदार सुरेश भोळे व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी भेट देऊन अधिष्ठता डॉक्टर गिरीश ठाकूर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून सर्व परिस्थितीचे माहिती जाणून घेतले.
जिल्हाधिकारी आयुक्त प्रसाद दिलेल्या माहितीनुसार बारा जणांचा मृत्यू झाला आहे तर अकरा जखमी झालेले आहेत त्यांच्यावर विविध ठिकाणी पक्षात सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.