जळगाव

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभव : अशोक जैन 

गणेश सोनवणे

जळगाव : आयुष्याच्या या वाटचालीत अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाचे आगमन, प्राण प्रतिष्ठा तसेच मंदिर निर्माणानिमित्त अयोध्या येथे जाण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती आहे! माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचे तर Leave this word better than you found it – सार्थक करूया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे!- आयुष्याच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षेत्रात माझ्या वडिलांचे हे ब्रीद वाक्य सत्यात उतरवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. या घटनेमुळे तर मी निश्चितच सविनय मात्र अभिमानाने सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांच्या या ब्रीद वाक्याचा अर्थ पूर्णपणे सार्थक झाला आहे.

आयोध्या मध्ये रामलल्ला विराजमान झालेत तो क्षण अविस्मरणीय होता. हा विस्मरणीय क्षण मला याची देही याची डोळे पाहाता आला.  जिल्ह्यातील 50 लाख नागरिकांच्या वतीने जिल्ह्यातील सात जणांना निमंत्रण मिळालेले होते. त्यामधील एक भाग्यवान मी होतो असे उद्गार जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काढले.

अयोध्या मध्ये राम लल्ला 22 जानेवारीला विराजमान झाले. सोहळा पाहण्याचा याची देही याची डोळे पाहण्याचा अनुभव मला मिळाला असे उद्गार अशोक जैन यांनी काढले. राम प्रभू च्या स्थापनेबद्दल व आयोध्येच्या अनुभव सांगताना त्यांनी सांगितले की अयोध्येत दुसरी दिवाळीचं त्यादिवशी साजरी करण्फोर आली. तसेच अयोध्येचे मुख्य गेट पासून तो मंदिरापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या संस्कृतीचे कार्यक्रम नृत्य सुरू होते.

नेहमी आपण सुरक्षारक्षकांचा कडक आवाज व नियमांच्या पलीकडे काहीच नाही. असे अनुभवलेले आहेत शिस्त म्हणजे शिस्त मात्र अयोध्येच्या ठिकाणी सुरक्षारक्षक व अधिकारी यांचा एक गोड व शिस्तीबद्ध अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. इथे अधिकारी जे सुरक्षारक्षक याच्या भूमिकेत होते. ते हात जोडून विनम्रपणे येणाऱ्या लोकांना विचारपूस करून सुरक्षा जात पडताळ करीत होते. सुरक्षा रक्षकांनी त्यांनी दिलेला बारकोड चा पास व आधार कार्ड व पुढे गेल्यावर स्कॅन पूर्ण शरीराचे याव्यतिरिक्त सुरक्षारक्षकांनी कधी कोणाला अरेरावी किंवा अर्वाचे शब्द उच्चारले नाही हा एक गोड अनुभव त्या ठिकाणी आला.

विविध महंत संत तसेच विविध धर्माचे प्रतिनिधी समाज सुधारक विविध क्षेत्रातील मान्यवर कलावंत उद्योजक अशा अनेकांना त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेले होते. संपूर्ण कार्यक्रम हा शिस्तबद्ध संपन्न झाला.

भविष्यात अयोध्या हे शहर मोठे पर्यटन क्षेत्र होईल असेही त्यांनी वक्तव्य केले. मंदिरामध्ये असलेल्या गालीच्या झाडे वगैरे या ठिकाणी ठिबकचे काम जैन इरिगेशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या मध्ये राम मंदिर झाल्यामुळे या ठिकाणी आता मोठमोठे हॉटेल व्यवसायिक तसेच इतर उद्योजक ही या ठिकाणी येणार आहेत त्यांची कामे सुरू झालेली आहेत. अयोध्या मध्ये 22 पर्यटन स्थळे आहेत तेथे कामे सुरू आहेत शरयु नदीच्या घाटावर एक नवीन घाट तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झालेल्या या ठिकाणी शरयु नदीची आरती तशी गंगेप्रमाणेच या ठिकाणीही होणार आहे.

महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या सर्वांचा तसेच आमच्या आई-वडिलांचा दिव्य आशिष आम्हाला लाभला असून थोरामोठ्यांचे आशीर्वाद ही पाठीशी आहेत. जळगाव जिल्हा वासियांचा-आपणासर्वांचा सदिच्छेमुळे मला अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. १४० कोटींच्या वर लोकसंख्या असेलेल्या या महान भारत वर्षातून तसेच जळगाव जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांच्या वतीने अयोध्या येथील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले.

निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी दि. १६ जानेवारी २०२४ रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांच्यावतीने मला आमंत्रण दिले. दि. २२ तारखेला लाभलेली अनुभूती म्हणजे सनातन धर्मात जगातील सर्वात मोठा सनातन धर्माचा उत्सव संपन्न झाला असेच म्हणता येईल.

२२ तारखेला जगातील सर्वात मोठा उत्सव साजरा झाला. अयोध्या नगरीत रामलल्लाच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा झाली. सर्व जग त्या क्षणाची आतुरतेनी वाट पहात होते.

१.  अयोध्या नगरीच्या आंतरराष्ट्रीय विमान तळाला वाल्मिक ऋषीचे नावं देण्यात आले आहे.
२.  हनुमानाची मूर्ती तर प्रत्येक ठिकाणी रामा सोबत आहे.
३.  जटायूचीही मूर्ती राम मंदिरात बसविण्यात आली आहे.
४.  मंदिरातील भोजन कक्षाला शबरीच नावं देण्यात आले आहे.
५. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यां तळोद्याच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्या आधी खान्देश होळकर राज्याचा भाग होता. त्या खान्देश राणीची अहिल्यादेवींचीही मूर्तीही राम मंदिरात बसविण्यात येणार आहे.
६.  थाळनेरच्या लता मंगेशकर यांचं नावं एका मुख्य चौकाला देण्यात आले आहे.
७.  सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याच्या पेक्षा उंच रामाचा पुतळा आयोध्येत बसाविण्याची योजना आहे. हां पुतळा गोंदूर धुळे येथील राम सुतार तयार करणार आहेत.
८.  सोनगीर हे तांबे पितळीच्या भांडयासाठी प्रसिद्धी आहे. या तांबट कासाराणी 200 ताब्याचे नक्षीदार कळस तयार करून आयोध्येलां पाठविले आहेत. या कळसानें रामलल्ला वर प्राण प्रतिष्ठाच्या वेळी जलाभीषक होणार आहे.
मला वाटत आयोध्येत एवढा मोठा सन्मान जो खान्देशचा झाला हां मान ईतर कोणालाही मिळाला नसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT