जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क - मद्यपान करणे शरीरास हानिकारक आहे, असे वारंवार सांगितले जात असले तरी मद्यपान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. तुम्ही सर्रास कोणत्याही परवानगीशिवाय दारू पित असेल तर हे तुमच्या अंगलट येऊ शकते. दारू पिण्यासाठीही काही नियम राज्य उत्पादन शुल्क विभागाने घालून दिले आहेत. नववर्ष स्वागत करण्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय मद्य प्राशन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मद्य प्राशन करण्यासाठी परवाना घ्यावा लागेल.
मद्यपान करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळते. मात्र, त्यालाही काही निर्बंध आहेत. 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहल असणारी माइल्ड बियर, बिझर पिण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे. बिझरमध्ये अल्कोहोल नसते, असे अनेकजण म्हणतात. पण, त्यातही 4.8 टक्के अल्कोहोल असते. वयाची 21 वर्ष पूर्ण केली असेल तर तुम्ही बिअर किंवा बिझरचे सेवन करू शकता.
मद्यपान करण्यासाठी 25 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणे गरजेचे आहे. मद्यसेवन परवाना (लायसेन्स) आवश्यक आीे. परवाना नसेल तर तुम्ही अधिकृरित्या मद्यपान करू शकत नाही.
जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 31 फर्स्टच्या पार्श्वभूमीवर एक लाख नागरिकांना एक दिवसीय मद्य प्राशन करण्याचे परवाने वितरीत करण्यात आले आहेत.विठ्ठल भुकन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्याठिकाणी सर्विसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करा.