The main square of Jalgaon city has become potholed
जळगाव शहरातील मुख्य चौक झाले खड्डेमय pudhari photo
जळगाव

जळगाव शहरातील मुख्य चौक झाले खड्डेमय

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ आला तरी जळगाव शहरातील रस्त्याच्या समस्या अजूनही सुटण्याचे नाव घेत नाही. शहरातील मुख्य चौक जवळील राणी लक्ष्मीबाई चौक, नेरी नाका या ठिकाणी चोवीस तास वर्दळ असते. अशा ठिकाणी अजूनही रस्ते खड्ड्यात आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेते सक्रिय होतात. या काळात कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. पाच वर्ष मात्र दुर्लक्ष असते. जळगावच्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. मुख्य चौक असलेल्या राणी लक्ष्मीबाई चौक ज्या ठिकाणी वर्दळ नेहमीच असते. एका बाजूला सिव्हील हॉस्पिटल तर दुसऱ्या बाजूला दाना बाजार, सराफ बाजार व इतर बाजार मंडी असल्याने जाणारे येणाऱ्यांची संख्या या चौकातून मोठ्या प्रमाणात आहे. या चौकातच गड्डे असल्याने वाहनधारक यांना अनेक समस्यांमधून जावा लागत आहे. नेरी नाका या चौकातही तीच परिस्थिती आहे. भर चौकामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यातून नागरीकांना आपला प्रवास करावा लागत आहे. या चौकात दिवस रात्र लहान पासून मोठ्या वाहनांची जा-ये सुरू असते. शहरातील दोघाही मुख्य चौकांमध्ये अशी दयनीय अवस्था झालेली असताना नगरपालिकेचे अधिकारी मगर गठ्ठ झालेले आहे. त्यांना गेल्या कित्येक दिवसापासून हे खड्डे दिसतच नाहीत का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

अशा रस्त्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस आल्यानंतर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाण्याचे ढाबा तयार होत आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे बजरंग बोगदा या वर्षीही पाण्याने भरला गेलेला दिसून आला मात्र कायमस्वरूपी या ठिकाणी पाणी साचणार नाही यावर कोणतीही उपाययोजना नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही.

शहरातील काही भागांमध्ये रस्त्याचे काम चालू आहे. तर काही ठिकाणी असे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होतेच परंतु वाहनचालकालाही अनेक दुखणे होतात.
- दिनेश चौधरी , मार्केटिंग अधिकारी
नवीन रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात आल्याने वळणावरच्या काही ठिकाणी उतार किंवा चढाईसाठी स्लोप बनवण्यात आलेला नाही. तर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्ठे खड्डे व रस्ते यामधील नेमके अंतरच समजत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले आहेत. तर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्यावरील खड्डा चुकवतांना वाहनांचे नुकसान तर होतच आहे. पण आर्थिक नुकसानही जास्त होत आहे. -
योगेश चौधरी- खाजगी वाहनधारक, जळगाव.
SCROLL FOR NEXT