जळगाव

जळगाव लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात २० मराठा समाज बांधवांची उमेदवारी

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (दि.१८) रोजी पवारवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकल मराठा समाजाच्या बैठकित एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभा निवडणुकीत जवळपास २० मराठा समाजाचे बांधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यासाठी पुढील रणनीती तयार करण्यात आली आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी काढलेल्या मोर्चात वाशी येथे करोडोच्या संख्येने धडकलेल्या मराठा समाज बांधवांच्या मोर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगे सोयऱ्यांची अधिसूचना देऊन मराठा समाजाला आश्वासित केले होते. मात्र जाहिर केलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने मराठयांची जाणीवपूर्वक फसवणूक केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने चाळीसगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (दि.१८) रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकित एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभेच्या निवडणुकीत जवळपास २० मराठा समाजाचे बांधव उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांची सामाजिक-राजकीय आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा मराठा समाज बांधवांनी उमेदवारी करण्यासाठी स्वच्छेने पुढे यावे तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. परंतु त्यांना उमेदवारी करायची ईच्छा आहे. अशा समाज बांधवांना लागणारे आर्थिक नियोजन मराठा समाजातील दानशूर व्यक्तींकडून घेण्यात येणार आहे. ज्यांना सामाजिक भावनेतून सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी आवर्जून सहकार्य करावे. चाळीसगाव शहर व तालुक्यातून ज्या मराठा समाजाच्या बांधवांना जळगाव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करायची आहे. त्यांनी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटीच्या समन्वयक भाऊसाहेब सोमवंशी, गणेश पवार, प्रशांत गायकवाड, सुधीर पाटील, खुशाल बिडे यांना संपर्क साधावा. या सकल मराठा समाजाच्या बैठकीस तमाल देशमुख, खुशाल बिडे, सुधीर पाटील, प्रा चंद्रकांत ठाकरे, प्रमोद पाटील, प्रदीप निकम, सुदर्शन देशमुख, राजेंद्र पाटील, स्वप्निल गायकवाड, मुकुंद पवार, खुशाल पाटील, भरत नवले, विनोद जाधव, सतीश पवार, दीपक देशमुख, छोटू अहिरे, कैलास देशमुख, समर्थ भोसले, पवन पाटील, स्वप्निल गायकवाड, नंदकिशोर पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT