जळगाव : अधिकारी आपल्या सोयीच्या नियमांप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करून आपल्यासाठी सोयी निर्माण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करताना खड्डे तर सार्वजनिक बांधकाम विभागात प्रवेश करताना खड्डेविरहित रस्ते यावरून अधिकारी आपल्या सोयीने नियम बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे कार्यालय आहे. या कार्यालयात सकाळ पासून सायंकाळपर्यंत नागरिकांची वर्दळ सुरु असते. वाहनांपासून तर पायदळ पर्यंत प्रत्येक जण या कार्यालयात आपापल्या प्रमाणे येत असतो. मात्र या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच खड्डे असल्याने आत प्रवेश करतानाच वाहनांना खड्ड्यातून वाहनांना दणके घेत प्रवेश करावा लागत आहे. तर मुख्य गेट पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता झाल्याने ते सर्वात मोठे अडचणीचे ठरलेले आहे.
दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रवेश करताना खड्डेविरहित रस्ता दिसून येत आहे. त्यामुळे यावरून एक गोष्ट लक्षात येते की, अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्यासाठी सोयी निर्माण करत आहेत. मात्र ज्याठिकाणी सर्वसामान्य नागरिक आपल्या कामासाठी येतात त्या कार्यालयातील प्रवेश द्वारावरील रस्त्यात पडलेले खड्डे कोणाला दिसत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागा समोर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे खड्डे दिसत नसल्याने या विभागाचे लक्ष गेलेले दिसून येत नाही
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला सिमेंट काँक्रीट करणाचे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र प्रवेशद्वारावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये थोडेफार सिमेंट टाकण्याची वेळ अधिकाऱ्यांना व ठेकेदार या दोघांनाही मिळालेला नाही.