अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी व शिक्षकवृंद. Pudhari News Network
जळगाव

SSC Result Jalgaon | आशा वर्करचा मुलगा प्रथम; अंध फिजिओथेरपिस्टच्या मुलीला व्हायचं अधिकारी

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये यंदाही 100 टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे दोघं प्रथम (९२ टक्के), जान्हवी प्रदीप सोनवणे, रिया एकनाथ नेमाडे दोघंही-द्वितीय (९१.६० टक्के) व मिताली सुकलाल नाथ, घोषिता जयंत पाटिल दोघंही - तृतीय (९१ टक्के), भावेश विकास गरूड - चतुर्थ (९०.८० टक्के), धिरज विकास पाटील - पाचवा (९०.६० टक्के) उत्तीर्ण झालेत. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी अभिनंदन केले. १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १० विद्यार्थी ९० टक्केच्या वर गुणप्राप्त केले. तर उर्वरीत विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असतानाही चिकाटीने अभ्यास करून यश प्राप्त केल्याने अनुभूतीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक आहे. स्कूलच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत सातत्याने शाळेचा १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राखल्याने शिक्षकांसह सहकाऱ्यांचेही कौतुक करतो.
अशोक जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन.
वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले. आई शिवणकाम करून संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करते. आजोबा साथीला आहेच मात्र बहिण भार्गवी सह कुटुंबाचा गाडा पुढे नेताना आई-आजोबांना तारेवरची कसरत करावी लागते. आता आई शिवणकामासह आशा वर्करचे काम करते. दोघांच्या खडतर प्रवासाची जाणिव असून अनुभूती स्कूलमधून प्रथम आल्याने त्यांना आनंदाची अनुभूती देता आली हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहे.
मोहित पाटील, विद्यार्थी.

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमुळे आमचे कार्यसिद्धीस झाले अशी प्रतिक्रिया अंध फिजिओथेरपी करणाऱ्या जयंत पाटील यांची आहे. आपल्या कन्येने मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही आनंद आहेच, समाजातील वंचित गरजू घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना घडविण्याचे काम भवरलाल जैन यांनी केले तेच काम अशोकभाऊ पुढे घेऊन जात आहे. तृतीय आलेल्या घोषिता पाटील चे स्वप्न स्पर्धा परिक्षा देऊन मोठं अधिकारी होण्याचं आहे. दहावीत शिक्षकांनी विशेष क्लास घेऊन अभ्यास घेतला त्यामुळे आम्हाला यशस्वी होता आले, अशी प्रतिक्रीया घोषिता ने दिली.

स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या रियाच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT