जळगाव

जळगाव जिल्ह्यातून सहा मोटरसायकल, एक डंपर चोरीला

गणेश सोनवणे

जळगाव; जिल्ह्यातून कासोदा, जळगाव शहर, चोपडा शहर, चाळीसगाव शहर, पारोळा, एरंडोल आणि शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा मोटरसायकल आणि एक डंपर चोरीला गेले आहेत. या चोरीचे एकूण मूल्य पाच लाख २५ हजार रुपये आहे.

कासोदा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कासोदा येथून चंद्रकांत विक्रम पाटील यांच्या घरासमोर २० हजार रुपयाची हिरो कंपनीची मोटरसायकल चोरीला गेली आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोधडिवाला मार्केटच्या मागच्या बाजूला रोडवरील शेख इमाम शेख अहमद यांची २५ हजार रुपये किमतीची शाईन मोटरसायकल चोरीला गेली आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक शौचालय समोरून मोहम्मद मुश्ताक आता बुल अन्सारी यांची वीस हजार रुपयाची मोटरसायकल चोरीला गेली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मालेगाव बायपास वरील खान सलीम हकीम यांच्या चिकन शॉप जवळील चहाच्या टपरीजवळून २५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली आहे. पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील किरण सुरेश पवार यांच्या घरासमोर वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली आहे. एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील शेताच्या बांधावरून कृष्णा दौलत पाटील यांची पंधरा हजार रुपयाची मोटरसायकल चोरीला गेली आहे.

जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या डी एन सी कॉलेज समोरील राज कावळे यांच्या प्लॉटवरून चार लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीच्या पिवळ्या रंगाचे डंपर चोरीला गेले आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये पोलीसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. पोलिसांनी या चोरीच्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, नागरिकांनीही आपल्या वाहनांचे संरक्षण करण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT