जळगाव: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (२२ डिसेंबर) सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. विशेषतः चांदीच्या दराने मोठी झेप घेतली असून, प्रति किलोमागे तब्बल १४,००० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
सोन्याच्या दरात पुन्हा तेजी
गेल्या आठवड्यात १५ आणि १६ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली होती. १६ डिसेंबरला २४ कॅरेट सोन्याचे दर १,३१,५०० रुपये (प्रति १० तोळे) पर्यंत खाली आले होते. मात्र, आज २२ डिसेंबर रोजी बाजार उघडताच सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली. सकाळी १,३३,३०० रुपयांवर असलेले २४ कॅरेट सोने दिवसाअखेर १,३३,५०० रुपयांवर पोहोचले. म्हणजेच अवघ्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात प्रति १० तोळ्यांमागे २,००० रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीची विक्रमी झेप
सोन्यापेक्षाही चांदीच्या दरातील वाढ अधिक धक्कादायक ठरली आहे. १६ डिसेंबरपर्यंत १,९१,००० रुपये प्रति किलो असलेल्या चांदीचा दर आज थेट २,०५,००० रुपयांवर पोहोचला आहे. औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे चांदीच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तुलनात्मक दर तक्ता (प्रति १० ग्राम/किलो):
तारीख. २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम)
१५ डिसेंबर. १,२१,६४०/-
१६ डिसेंबर १,२०,४५०
२२ डिसेंबर (आज) १,२२,२९०
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम)
१५ डिसेंबर. १,३२,८००/-
१६ डिसेंबर. १,३१,५००/-
२२ डिसेंबर (आज) १,३३,५००/-
चांदी (१ किलो)
१५ डिसेंबर. १,९१,०००/-
१६ डिसेंबर. १,९१,०००/-
२२ डिसेंबर (आज)२,०५,०००
खरेदीदारांच्या संख्येत वाढ
लग्नसराईचा हंगाम आणि गुंतवणुकीसाठी सोन्याकडे बघण्याचा कल यामुळे खरेदी वाढली आहे. मात्र, अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे व्यवसायिक यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे त्यामुळे चांदीचे दर वाढल्याचे भंगाळे गोल्ड चे संचालक आकाश भंगाळे यांनी सांगितले