झोपलेल्या मुलीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न, पाचोरा तालुक्यातील घटना file photo
जळगाव

धक्कादायक | झोपलेल्या मुलीला उचलून पळवून नेण्याचा प्रयत्न, पाचोरा तालुक्यातील घटना

मुलीने आईच्या साडीचा पदर ओढल्याने बचावली

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : पाचोरा तालुक्यातून बारा वर्षीय मुलीला रात्री झोपेत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जवळच तिची आई देखील झोपलेली होती, मुलीने त्याचवेळी आईच्या साडीचा पदर ओढल्याने आईला जाग आली. याप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यां सोबत झोपलेली होती. झोपेत असलेल्या बारा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संशयित आरोपी विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना मुलीने शेजारी झोपलेल्या आईच्या साडीचा पदर ओढला व आईला जाग आली. आईने आरडाओरड करताच संशयित आरोपीने तेथून पळ काढला.

संशयिताचा मुलीच्या नातेवाइकांनी शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच त्यांनीही तपासाचे चक्र गतिमान करत त्याचा शोध घेतला. आरोपीला ताब्यात घेत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT