जळगाव: दसरा दिवाळी या हिंदू धर्मातील पारंपारिक सण उत्सवांमध्ये दसऱ्याच्या दिवशी परंपरेने रावणाचे दहन करण्याची परंपरा सुरू आहे. असत्यावर सत्याची विजयाचे प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी मेघनाद कुंभकर्ण व रावणाचा पुतळा दहन करण्याची परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे. या परंपरेला फाटा देत भुसावळमध्ये या वर्षापासून रावण रुपी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचे दहन करणाऱ्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यामुळे आता रावण श्रीलंकेचा नाही तर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा झालेला आहे. त्या आतंकवादी रावणाचे दहन भुसावळ मध्ये करण्यात आले व त्याची रीतसर परवानगी घेण्यात आली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
दसरा म्हणजे आपट्याची पानं देऊन एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा आशीर्वाद हा सण साजरा करण्यात येतो. तर दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी मेघनाथ कुंभकर्ण रावण या तीन जणांचे पुतळ्याचे तहाने संपूर्ण भारतामध्ये करण्यात येते श्रीरामांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता. रावणाचा वध केल्यामुळे असत्यावर सत्याचा विजय झाला होता. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकामध्ये ही रावण दहन करण्याची परंपरा कायम आहे.
प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करण्यात येते याबरोबर कुंभकर्ण व मेघनाथ या पुतळ्याचे दहन करण्यात येते.
मात्र भुसावळ मध्ये यावर्षी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा म्हणजे हिंदू संस्कृतीच्या भाषेमध्ये रावणाचे दहन करण्यात आले. रावणाची लंका ही श्रीलंकेत होती त्यासाठी रामाने सेतू बांधून लंकेवर वानर सेनेसह विजय मिळवला होता. भुसावळ मध्ये आता रावणाच्या जागी रावणाला किंवा रावण रुपी आतंकवाद्यांना दहां करण्याची परंपरा सुरू झालेली आहे. यावेळी रावण रुपी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांचे दहन करण्यात आले. त्यामुळे आयोजकांनी लंकेच्या रावणाला भारतापासून अलग झालेल्या पाकिस्तानचा रावण करून टाकलेला आहे.