Raksha Khadse Member of the Lok Sabha pudhari file photo
जळगाव

Raksha Khadse | लाभार्थी शेतकऱ्यांना 327 कोटी रुपयाचा लाभ मिळणार

Jalgaon : 2023-24 अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 327 कोटी रुपयाचा लाभ मिळणार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : प्रधानमंत्री फळ पिक विमा योजना 2023-24 अंतर्गत पिकविमा धारक शेतकऱ्यांना एकूण 327 कोटी रुपयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार 2023-24” मधील फळ पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 84 महसूल मंडळात सलग 5 दिवस तापमान 45 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसतो. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने या शेतकऱ्यांना शासकीय निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

तसेच या पूर्वी जानेवारी महिन्यात सलग 3 दिवस कमी तापमानामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. वातावरणातील बदलामुळे कमी व जास्त तापमानामुळे झालेल्या एकूण नुकसान भरपाईची 327,55,15,184 रुपये एवढी एकत्रित रक्कम लाभ काही दिवसामध्ये जळगाव जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

नुकसान भरपाईस पात्र जळगाव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे असे...

  • भुसावळ : कुऱ्हे प्र.नशिराबाद, पिंपळगाव खु., वरणगाव.

  • बोदवड : बोदवड, करंजी, नाडगांव.

  • चोपडा : अडावद, चहार्डी, चोपडा, धानोरा प्र.अडावद, गोरगावले बु., हातेड बु., लासूर.

  • जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी बु., पहूर, फत्तेपूर, शेंदुर्णी, तोंडापूर, वाकळी

  • मुक्ताईनगर : अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे, मुक्ताईनगर.

  • रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदे प्र.यावल,, निंभोरा बू., रावेर, सावदा.

  • यावल : भालोद, बामणोद, फैजपूर, किनगाव बू., साकाळी, यावल.

  • अमळनेर : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, पातोंडा, शिरुड, वावडे.

  • भडगाव : आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगांव.

  • चाळीसगाव : बहाळ, चाळीसगाव, हातळे, खडकी बु., मेहुणबारे, शिरसगांव, तळेगांव.

  • धरणगाव : चांदसर बु., धरणगाव, पाळधी बु., पिंप्री खु., साळवे, सोनवद बु.

  • एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगांव, उत्राण गुजर हद्द

  • जळगाव : असोदा, भोकर, जळगाव, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा.

  • पाचोरा : गाळण बु., कुऱ्हाड खु., नगरदेवळे बु., नांद्रा, पाचोरा, पिंपळगांव बु., वरखेडी बु.

  • पारोळा : बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळवे बु., तामसवाडी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT