जळगाव

Lok sabha Election 2024 Results : रावेरमध्ये रक्षा खडसेंची विजयी घौडदोड, तीन लाख 88 हजाराचा लीड

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा– रावेर लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांची विजयी घौडदोड सुरु आहे. तब्बल तीन लाख 88 हजाराचा लीड त्यांनी घेतला आहे.

सुरुवातीला रक्षा खडसेंना तिकीट मिळणार की नाही अगदी इतपासून शंका उपस्थित केल्या जात होत्या.
मात्र भाजपने रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी दिली. त्यानंतर मतदारसंघात अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी बदलली जावू शकते असेही बोलले जात होते मात्र, रक्षा खडसे यांचे तिकीट बदलले गेले नाही.

पंधराव्या फेरी अखेरीस तीन लाख 88 हजार 919 मतांचा लीड घेऊन रक्षा खडसे यांनी आपल्या तिसऱ्या टर्मची विजयाची घौडदोड कायम ठेवलेली आहे. पंधराव्या फेरीपर्यंत खडसे यांना 4,15, 432 अशी मते मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 2,4 6,5 13 इतकी मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांना 39 हजार 156 मते मिळाली आहेत. रावेर लोकसभेमध्ये 2834 मतदारांनी नोटाना पसंती दिली आहे. या मतदारसंघात तीन लाख 88 हजार 919 मतांचा लीड घेऊन रक्षा खडसे विजयाचा झेंडा रोवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT