पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वन पर्यटनासाठी पाच वनसफारी वाहने व पोलिसांच्या 63 दुचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. Pudhari News Network
जळगाव

Pal Wildlife Sanctuary | जळगावात वन्यजीव पर्यटनासह पोलीस आधुनिकीकरणाला गती

वनसफारी वाहने व पोलिसांच्या 63 दुचाकी वाहनांचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. यावेळी वन पर्यटनासाठी पाच वनसफारी वाहने व पोलिसांच्या 63 दुचाकी वाहनांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

वन्यजीव पर्यटनाला चालना

पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक वाहने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वाहनांच्या सहाय्याने 27 किलोमीटर परिसरातील वाघ, बिबटे, अस्वल आणि अन्य वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. या नवीन उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून 12 स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या वाहनांचे व्यवस्थापन स्थानिक वन व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे, ज्यामुळे पर्यावरणीय संवेदनशीलतेचा विचार केला जाणार आहे.

पाल हे जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असून पाल गाव रावेर तालुक्यात स्थित आहे. जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पाल प्रसिद्ध आहे. पाल सातपुडा पर्वतरांगेवर असून या अभयारण्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे.

पोलीस दलाचे आधुनिकीकरण

जिल्ह्यातील पोलीस दलासाठी 63 दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग आपले पोलीस संकल्पना, डायल 112 आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि बीट पेट्रोलिंगसाठी होणार आहे. या वाहनांमुळे पोलीस दलाची गती, प्रतिसाद क्षमता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

लोकार्पण समारंभ

या दोन्ही उपक्रमांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वन्यजीव संवर्धन आणि पोलीस दलाचे आधुनिकीकरण या उद्दिष्टांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. या लोकार्पणामुळे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि सुरक्षेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. वन्यजीव अभयारण्यातील अत्याधुनिक सुविधा मुळे पर्यटक वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT