जळगाव |येथील सागर पार्क या ठिकाणी मराठा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहेत. ही क्रिकेट स्पर्धा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये खेळली जाणार आहे. यामध्ये पुरुष व महिला 42 संघांनी भाग घेतला आहे
मराठा प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. या प्रीमियर लीग मध्ये पुरुषांची 36 संघ महिलांचे सहा असे 42 संघ सहभागी झालेले आहेत. यामध्ये पुरुषांचे 78 सामने तर महिलांचे 14 सामने होणार आहेत
या प्रीमियर लीग बरोबरच मेडिकल ऑर्थोपेडिक लायब्ररी व व्यावसायिक डिरेक्टरी चे उद्घाटन होणार आहे
प्रीमियर लीगच्या उद्घाटनाला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील तर प्रमुख व्यक्त म्हणून प्राचार्य डॉक्टर स्मिता रावसाहेब देशमुख शिवाजी आर्ट्स व कॉमर्स कॉलेज अमरावती यांच्यासह डीडी बच्छाव रोहित निकम, श्रीराम पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रमोद नाना पाटील, मनोज पाटील, डॉक्टर राजेश पाटील, भूषण पाटील, विनोद सोनवणे हे उपस्थित राहणार आहे
तर मराठा प्रीमियर लीग चे ब्रँड अँबेसेडर म्हणून एडवोकेट उज्वल निकम हेही उपस्थित राहणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभाच्या 9 फेब्रुवारी रोजी विशेष उपस्थितीमध्ये भारतीय संघाच्या क्रिकेटर अजिंक्य रहाणे, विशेष महानिरीक्षक कारागृह डॉक्टर जालिंदर सुपेकर, डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण, खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील ,आ. अनिल पाटील, गुलाबराव देवकर, माजी खा. उन्मेष पाटील जगन्नाथ पाटील व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे
मराठा प्रीमियर लीग मध्ये एका दिवसाला 11 सामने खेळले जाणार आहेत व दहा ओव्हरचे हे सामना असणार आहे.