जळगाव

भुसावळ रेल्वे स्थानकावर फक्त गार्डन, रेस्टॉरंट नाही : महाव्यवस्थापक यादव

गणेश सोनवणे

जळगांव- भुसावळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर फक्त गार्डन राहील. त्या ठिकाणी कोणतेही रेस्टॉरंट नको अशा सूचना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक झाल्यानंतर प्रथमच भुसावळ विभागाचे निरीक्षण करण्यासाठी आलेले आर. के. यादव यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आर. के. यादव यांनी भुसावळ विभागाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी भुसावळ स्थानकात पाहणी करताना बस स्थानकाकडून निर्माण करण्यात येणाऱ्या बाजुने तसेच बस स्थानकातील प्रवासी बस स्थानकात येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा ठेवावा अशा सूचना केल्या. तसेच रेल्वे स्थानकाबाहेरील कोच रेस्टॉरंट तयार करण्याचे नियोजन होते. त्याची पाहणी यादव यांनी करून या ठिकाणी रेस्टॉरंट करू नका अशा सूचना दिल्यात. ज्या ठिकाणी हे रेस्टॉरंट तयार करण्यात येते ते गार्डन असून त्या ठिकाणी फक्त गार्डनच ठेवावे.

महाव्यवस्थापक आर के यादव भुसावळ विभागाचे डीआरएम असताना त्यांनी खत सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता मात्र तो बंद पडलेला असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अधिकाऱ्यांना त्या प्रकल्पाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. रेल्वेच्या परिसरातील वृक्ष तोडण्या संदर्भात वृक्षतोड थांबवली जाणार आहे. कुणालाही वृक्षतोडीला परवानगी दिली जाणार नाही असेही ते म्हणाले. रेल्वे कॉलनी व रेल्वे परिसरामध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्त वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT