जळगाव

‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’चे आयजी बी.जी. शेखर यांच्या हस्ते लोकार्पण

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पोलिसांना गुन्हे उकल होण्यासाठी एक कॅमेरा पोलिसांसाठी ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून 58 कॅमेरांचे लोकार्पण आज नाशिक परिषदचे आयाजी बीजी शेखर पाटील यांच्या हस्ते दापोरकर मंगल कार्यालय येथे झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर, पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी वाय एस पी संदीप गावित, माजी महापौर स्मिता महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे उपस्थित होते.

सध्याला आयजी बी जी शेखर पाटील हे विशेष वार्षिक तपासणीसाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. आज दि. 20  दापोरकर मंगल कार्यालय या ठिकाणी एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेतून 58 कॅमेराचे लोकार्पण त्यांचे हस्ते करण्यात आले. यामध्ये शहर पोलीस स्टेशन 28 व शनिपेठ 29 असे कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. यावेळी बोलताना आय जी बी जी शेखर पाटील म्हणाले की, एक कॅमेरा पोलिसांसाठी या संकल्पनेतून जिल्ह्यात तसेच नाशिक रेल्वे मध्ये मोठ्या संख्येने नागरिक व लोकसभातून कॅमेरे बसवण्यात येत आहे. यामुळे चोऱ्यांना आळा बसवण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले आहे.

जिल्ह्यातील अमळनेर येथे बसवण्यात आलेला 500 कॅमेरांमुळे त्या ठिकाणी काही तासातच चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येत आहे. कॅमेरा हा पोलिसांच्या व तसेच कायद्याच्या दृष्टीने तिसरा साक्षीदार म्हणून आज उभा आहे. त्यामुळे लवकरात लवकर चोरांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनाही यश येते म्हणूनच जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1362 कॅमेरे लागलेल्या नाशिक रिजनमध्ये 7707 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच यावेळी ज्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी गणेश मंडळांनी पोलिसांना एक कॅमेरा पोलिसांसाठी यामध्ये सहकार्य केले. त्यांच्या सत्कार करण्यात आला व त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT