जळगाव | शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीने घरात गळफास घेऊन जीवन संपविले. २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली आहे. जीवन संपविणारा व्यक्ती जिल्हापरिषदेचा कंत्राटी कर्मचारी होता, त्यामुळे जिल्हापरिषदेतही या घटनेने खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याने जीवन संपविण्यापूर्वी मोबाईलवर सुसाईट नोट लिहून त्याच्या परिवारातील व्यक्तींच्या मोबाईलवर पाठवून दिली होती त्यात काही गंभीर आरोप करण्यात आले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा परिषदेतील डीआरडीए विभागातील बचतगट विभागात कंत्राटी पद्धतीने अनिल हरी बडगुजर (वय ४६, रा.जीवन नगर ह.मु. वाघ नगर जळगाव) हे मॅनेजर म्हणून काम करत होते. २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता अनिल हरी बडगुजर याने वाघ नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून जीवन संपविले. जीवन संपविण्यापूर्वी अनिल हरी बडगुजर याने सुसाईड नोट लिहून आईवडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठवून दिली होती. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी गेले. पण तोपर्यंत अनिल बडगुजर याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, अनिल याला गेल्या २ वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी ६ लाखांची मागणी केली. सुरूवातीला ६ लाख रूपये दिले परंतू त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा ६ लाखांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. प्रकरणात पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
“आई आणा मला माफ करं. ह्या वयात मी तुम्हाला नाही ते दुःख देत आहे. पण खरचं मी आता खूप थकलो आहे, जेंव्हापासुन मला समजायला लागले तेव्हा पासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो, आज नाही तर उद्याचा दिवस माझा राहिलं, ह्या आशेवर जगत आलो. पण संकट माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत, मला जगू वाटत होते. तुम्ही आहेत तो पर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पण मी किती बदनशिबी माझ्याच इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही. (केसीएन)काय पाप केले होते काय माहित ?पण मी सर्वांचे चांगले होईल ह्याचं विचाराने जगत आलो, तरी माझ्या वाट्याला असे दुःख यावे,असे संकट यावे, मी माझ्या स्वतच्या. बुध्दीवर आज पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहीली गेली नाही, स्वतः च्या स्वार्थासाठी हरेश्र्वर भोई याने काही महिलांचा वापर केला.
मला एक वर्षापूर्वी सर्व समजले होते पण मी दुर्लक्ष करत होतों. माझ्या मरणास हरेश्र्वर भोई यास जबाबदार धरण्यात यावे.
राजु लोखंडे हे फक्तं पैश्यासाठी भोईचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान केले, यांना फक्त पैसा प्रिय आहे, पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. भोईचे ऐकून शरद पाटील, संदिप खेडकर यांनी रुपाली पाटील, सुरेखा पाटील, कोमल जावळे, साधना देशमुख, सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्यात, PDना काही अधिकार नसतांना त्यांनी माझे वैयक्तिक बँक खातेचे तपशील सन २०२० पासून काढले. पण त्यात त्यांना काहिच आढळून आले नाही, कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर सर्व व्यवहार करत होतो, त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्र्वर भोई, राजु लोखंडे, कोमल जावळे,सुरेखा पाटील,रुपाली पाटील, सीमा पाटील,साधना देशमुख,शरद पाटील,संदिप खेडकर यांना दोषी ठरवण्यात यावे व जो पर्यंत यांना अटक होत नाही, तो पर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यात येऊं नये ही माझी शेवटची ईच्छा”असे नमूद केले आहे.