केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नेपाळ दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात भेट दिली.
नेपाळला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील 27 जणांचा बस अपघातात मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना वायुसेनेच्या विमानाने नाशिकला आणले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी नेपाळ येथे गेले होते.पाळमधील तनहुन जिल्ह्यात (दि. 23) रोजी भाविकांच्या बसचा अपघात होऊन ती बस थेट मर्स्यांगडी नदीत नदीत कोसळली. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्चिमेकडे अबुखैरेनी गावजवळ हा अपघात घडला. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील 27 जणांचा मृत्यू झाला.