जळगाव

जळगावात खासदारांच्या निलंबनाबाबत राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

दिनेश चोरगे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांना निलंबित करण्यात आले. या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आज (दि.२०) दुपारी चार वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांना निलंबित करण्यात आले आहे. शेतीमाल व कांदा निर्यात प्रश्नाबाबत ते संसदेत चर्चा करणार होते, मात्र हे प्रश्न मांडण्याआधीच त्यांना निलंबित केले. इतक्या मोठ्या संख्येने खासदारांना निलंबित करण्याची ही पहिलीच घटना आहे. हे निलंबन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, वंदना चौधरी, उमेश पाटील, रमेश पाटील, डॉक्टर रिजवान खाटीक, इब्राहिम तडवी, चेतन पवार, आकाश हिवाळे, वाय एस महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT