जळगांव पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री. अंकित यांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप हॅक केले असून या बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना संशयास्पद मेसेज पाठवण्यात येत आहे. अशा स्वरुपाचे मेसेज आल्यास त्याची दखल घेऊ नये व त्याची तक्रार दाखल करावी असे आवाहन मुख्याधिकारी अंकित यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री अंकित यांचे नाव व छायाचित्र वापरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट प्रोफाइल तयार केले आहे. या बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून व मोबाईल क्रमांक 94 78 25 600 60 यावरून जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांना संशयास्पद मेसेज मिळालेले आहेत. संबंधित अज्ञात व्यक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी अंकित असल्याचे भासवित आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही व ही फसवणूक लक्षात घेता या मेसेजला कोणीही बळी पडू नये असा प्रकार आपल्या निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.